व्यसन हे दारूचे असो, सिगारेट अथवा तंबाखूचे, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत परीणाम झाल्याशिवाय राहत नाही.
तंबाखूमुळे दर ८ सेकंदाला 'एक' मृत्यु घडतो.
भारतात प्रतिवर्षी तंबाखूमुळे ८ ते ९ लाख लोकांचा मृत्यू होतो.
सर्वात महत्वाचे व्यसन करायला कोणाला आवडते…
साधी तंबाखूची पुडी घेताना दोन वेळा पाहतो कोण आपल्याला बघत तर नाही ना आपण पुडी घेतोय.
सर्व कळतंय पण वळत नाही.
तंबाखू न सुटण्याचे एक खास कारण, नाही खाल्ली तर टॉयलेट होत नाही असा गैरसमज. जाऊ नका दोन दिवस बघूया काय होतंय!
एक मित्र सकाळी चहा मध्ये क्रीमरोल बुडवून खाल्याशिवाय टॉयलेट ला जात नसे त्याला त्याशिवाय जमत नसे.
हि फक्त मानसिकता आहे दुसरे काही नाही.
व्यसन सोडन व्यसन लागण्यापेक्षा सोपं आहे.
कोणत्याही गोष्टीची सवय लागण्यास आपल्याला ती गोष्ट कमीतकमी २१ दिवस सलग करावी लागते नंतरच ते व्यसन होते.
आणि नंतर मात्र त्याशिवाय मला जमत नाही म्हणून चालू ठेवतो.
जिओ फ्री देण्या मागे पण मला हेच कारण वाटते..
सोपा उपाय करून बघा
स्वतःशी थोडे बोला मी सोडू शकत नाही म्हणजे आपले नियंत्रण आपल्यावर नाही मी पाहिजे तसा नाही वागू शकत ज्या नको असणाऱ्या गोष्टी आपण करतोय. दुसऱ्याचे ऐकून वागतो म्हटल तर किती राग येतो तसा राग येउ द्या, माझे शरीर आहे मला पाहिजे ते मी खायीन. हे केलेच पाहिजे असे बंधन नको. मी मला पाहिजे तसा राहू शकतो हे सिद्ध करा. तुम्ही म्हणाल उद्यापासून बंद करु आयुष्यात उद्याचा दिवस उगवणार नाही. अत्ता पासून निश्चय करा आज मी नाही खाणार. आज फक्त नाही खायची उद्या खायचीच आहे असे मनाला सांगा, ज्यावेळेस खुपच अस्वस्थ वाटेल तेव्हा आल्याचा तुकडा तोंडात टाका किंवा आल्याचा चहा घ्या ती वेळ पण निघून जायील, तरीही तंबाखू खाण्याची इच्छा झाली तर गुगल वर tobacco cancer images बघा खूप फरक पडेल, एक दिवस कसाही काढा बघा एक दिवस न खाता गेल्या नंतर लक्षात येईल आपल्याला काहीच त्रास होत नाही का विनाकारण आपण तंबाखू खातोय पुन्हा नाही खावी लागणार परंतु नंतर सुटल्यानंतर गंमत म्हणून पुन्हा त्या गोष्टीला हात लावायचा नाही नाहीतर २१ दिवस कधी जातील ते कळणार पण नाही.
याप्रमाणे तुम्ही जगातले कोणतेही व्यसन सोडू शकता.
ट्विटर, व्हाट्सअप, फेसबुक, यूट्यूब यांना सुद्धा आठवड्यातून एक दिवस सुट्टी पाहिजे.
तंबाखू , सिगारेट सोडण्याचे फायदे :
- तुमच्यातील कँसर वा हदयरोग होण्याचे धोके कमी होतात.
- तुम्हाला धूम्रपानामुळे होणारा खोकला नाहीसा होईल.
- तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.
- तुम्ही स्वतः स्वतःचे नियंत्रक व्हाल, सिगारेट, तंबाखू तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही.
- आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक, आदर्श बनाल.
- तुमच्या जोडीदाराला तुमचा घाण वास येणार नाही
- लपवून,चोरून व्येसन करावे लागणार नाही.
दुसऱ्यांनी आपले ऐकावे, आपल्याला चांगले म्हणावे, आपली वाहवा करावी, सर्व ठिकाणी आपल्याला मान मिळावा, आपला आदर्श घ्यावा हे बऱ्याच जणांना वाटते परंतू त्यासाठी व्यसनी असून चालत नाही.
केल्याने होत आहेरे
ReplyDelete