Saturday, April 29, 2017

भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके आज या जगात नाहीत पण त्यांच्या बाबतीत घडलेला अद्भुत चमत्कार वाचायला मीळाला.


भारतातील प्रख्यात हार्ट - स्पेशालिस्ट डाॅ. मांडके आज खूप आनंदात होते.

त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.

त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने  दिल्लीला जायला निघाले होते.

ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले.

डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात....

इतक्यात ....

अचानक ...विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले.

डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले...

विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे.

त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार  भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.

जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.

त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता.

पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले....

प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला..

रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते.
बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत...

पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते...

सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले.

कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला.

एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले.

तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.

त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले.

जरा वेळाने ती म्हणाली ..

माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का?

डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!

ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली...

प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती.

डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!

काही वेळाने तिची प्रार्थना संपली. ...

डाॅ. नी तिला विचारले ...

या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी?

देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का?

आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात?
....

त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली...

खोल आवाजात ती म्हणाली ...

माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे..
मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत..

मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल..."
...
पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली..

डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले ...
काय बोलावे ते कळेनाच त्यांना ...

त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला.

कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही....

गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला ...

याच घरात आसरा घ्यावा लागला ...

आणि ...आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती...
...

काय अद्भूत् .. चमत्कारच जसा ..

काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले ...!
...

सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ....

देवावरची अपार निष्ठा !
...

कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!

या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण देव आहे एवढे मात्र नक्की......!!!!

Monday, April 10, 2017

हि छोटी गोष्ट आहे डॉ. विनय कोपरकर यांची

डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते. निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस .. व्यसनापासून हजारो हात  लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं.. फक्त ३ महिन्याचा अवधी ... मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला.  पण ... मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप match  नाही झाला.... १ पर्याय संपला...  मुलाची लिव्हर साईझ ३५ हवी होती .... ती फक्त २९ होती... (अश्या केस मध्ये donar १% सुद्धा कमी असता कामा नये)  दुसरा पण पर्याय संपला.. मग सुरु झाला माझा प्रवास ... मीही एक डॉक्टर... डर्मीटोलॉजिस्ट... खर तर एक हजाम सुद्धा... डॉक्टरकी करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडन ला जाऊन हेअर कट चा कोर्से केला. पुण्यात आल्यावर ८० एक ९० च्या दशकातील पुरुष्यांसाठी भारतातील पाहिलं  Beauty  parlour सुरु केलं. लोकांनी वेड्यात काढलं. पुरुषांसाठी palour हि संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचनी पडत नव्हती. हळू हळू लोक केस कापायला का असेना यायला लागले ... बघता बघता एकाच्या दोन ..दोनाच्या चार अशा ११ शाखा भारतात् चालू केल्या... अनेकांना रोजगार मिळाला... क्लिनिक ... palour वेळ पुरेनासा झाला. पण .... पण नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हतं .. म्हणूनच तर लिव्हर खराब होणे यासारखा भयंकर आजार मला झाला. वाटलं ... मीच / मलाच का ??? पण ,,, कुणीतरी दाता  आपल्याला लिव्हर देईल .... याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरल नव्हतं (डॉक्टर असूनही) वेळ कमी होता फक्त ३ महिने .... २ महिने होऊन गेले... तिसरा महिना उजाडला. या  केस मध्ये हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, जलोदर झालं होत (३२ लिटर पोटात पाणी होत) वाटू लागलं आपला प्रवास संपला.  पण इथेही नियतीने तिची किमया दाखवली. एका accident  मध्ये ब्रेन डेड  झालेल्या व्यक्तीच लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला. ८ ते १० अतिशय हुशार ... जगातल्या मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आलेले ...  ध्यासाने झपाटलेले डॉक्टर .. ५.३० तासांच्या अथक प्रयत्नांनी ( लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हे कमीत कमी २४ तासांचे operation ... आणि कमीत कमी २५ रक्ताच्या बाटल्या लागतात हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होत) यशस्वी झालं तेही एकही रक्ताचा थेंबही न देता. खर तर आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला (Foreign Body)  तरी आपलं शरीर तो कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. इथे शरीरात एक (Foreign Body) लिव्हर बसवल होत. शरीर ती Foreign Body बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून जोपर्यंत शरीर ते accept करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते. त्याच काळात बाकी कसलं इन्फेकशन झालं तरी तेहीं शरीराला कळत नाही म्हणून घरात बायको आणि मूलं ... जेवायला देतानाही मास्क. हँडग्लोव्हस ... संपूर्ण steralize होऊन येत, दिवसाला ४२ गोळ्या. डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरु करू का विचारलं... पोटावर फक्त १०४ टाके होते  म्हणून त्यांनी नकार दिला. पण मी हट्ट केला तर ... सायकलिंग करू शकता म्हणाले. थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरु केलं. तीथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप भेटला. १ वर्ष गेलं. पुणे एक गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती. ३१ तासाच्या आत ६०० किमी अंतर कापायचे होते. मी म्हणालो मला घ्यायचा आहे सहभाग. माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले. ६०० किमी चे अंतर . त्यात मी १८३ किमी चे अंतर सायकलिंग केले. आज चार वर्ष झाली. योग्य आहार, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे इच्छाशक्ती.... हि त्रिसूत्री कधीच नाही सोडली. पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझं क्लिनिक आणि माझं passion असलेलं Parlour .... पुन्हा ४ शाखा पुण्यात सुरु केल्या. papillon mens parlour हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं. पण हे सगळं पुन्हा करताना घरच जेवण ... ५० मिनिटे उकळलेलं पाणी .. आणि खूप सारी पथ्ये ... माझ्याकडे आज खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईल. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्या. व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात (गव्हरमेंट कायद्यानुसार अवयव देणारा आणि घेणारा हे कधीच कुणाला कळत नाही)  माणसाच्या घरच्यांच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून  शरीराची माती होण्यापेक्षा हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे इ. दान करून कुणालातरी  जीवदान द्या.
हि छोटी गोष्ट आहे डॉ. विनय कोपरकर यांची ...... यातून काय घ्यायचं हे आपलं आपणच ठरवुया..!!

डॅा• घोसालळकर यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती।

              
कपालभाती प्राणायाम     

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.

कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
    
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॕल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
   
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.


कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.


कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

*किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.
    
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.

विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.

डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स...


१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - सर्दी, खोकला, ताप येत नाही.

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.

५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे - हाडे मजबूत होतात.

९) ऐकू न येणे- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) शरीरशुद्धी साठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) जुलाबासाठी- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) नाकाचे हाड वाढणे ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) मुळव्याधासाठी अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी *थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. *कातडी गोल्डन रंगाची होते.

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) पोटाच्या आजारावर -वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) कानाच्या पडद्याला भोक - उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) हात पायाला घाम येणे -सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.

२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.

         डॉ.स्वागत तोडकर
         चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,कोल्हापूर.